जनतेज न्युज

चोरे येथील वनरक्षकास १५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत पथकाने पकडले रंगेहाथ

प्रतिनिधि , सातारा : सातारा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नवीन वर्षातील ‘बोहणी’ वनविभागापासून झाली आहे. लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना चोरे तालुका कराड येथील वनरक्षकास रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

राहुल बजरंग रणदिवे असे या लाचखोर वनरक्षकाचे नाव आहे. संबंधित तक्रारदार यांच्या लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी वनरक्षक रणदिवे याने 25 हजार रुपयांची लाच मागितली होती पण 15 हजार तडजोड द्यायचे ठरले. यासंबंधी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला त्यामध्ये राहुल रणदिवे लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडला. त्याच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पोलीस ताटे, पोलीस कॉन्स्टेबल खरात, येवले यांनी ही कामगिरी फत्ते केली.