प्रतिनिधी, बुलडाणा : चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला जि. सोलापुर २३ व २४ येथे होणार आहे या अनुषंगाने आज खामगांव येथे धनगर साहित्य परिषदेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. २०२० मधे चौथे साहित्य सम्मेलन मा.आमदार गणपतराव देशमुख यांच्या इच्छेनुसार सांगोला येथे जाहीर झाले होते. मात्र कोविड-१९ मुळे साहित्य सम्मेलन स्थगित करण्यात आले होते. दरवर्षी या साहित्य सम्मेलनाला २५ ते ३० हजार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देशभरतुन हजेरी लावत असतात. मात्र या सम्मेलनास किमान ४० हजार विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावण्याची अपेक्षा असल्याचे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक डॉ. अभिमन्यू टकले यांनी यावेळी सांगितले. या संमेलनात दोन दिवस भरगच्च असे कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. यामधे साहित्य दिंडी काढण्यात येणार असून दिंडी मधे ४० सजवलेले रथ असतील. या साहित्य सम्मेलनात ऐतिहासिक वेश भूषा धारण केलेले विद्यार्थी, शिक्षक, कलाकार उपस्थित असतील. यात जमातीचा इतिहास, धर्म, संस्कृति साहित्य रूढि परंपरा चाली रीती शैक्षणिक प्रबोधन रथ, सजीव देखावे, लेजिम, भजनी मंडल, गाजे ढोल, शोभा यात्रा असतील. या साहित्य नागरीचे नाव संत बाळु मामा नगरी असे असेल, तर ग्रंथ दालनचे नाव संत कनकदास नगरी असे ठेवण्यात येणार आहे. या साहित्य सम्मेलनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे तर समारोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. सदर साहित्य सम्मेलनाला आमदार, खासदार, साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, प्रशासन विभागातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रतिनिधी, बुलडाणा :
