प्रतिनिधी , ठाणे : मनसेचे विभाग अध्यक्ष जमील शेख यांच्या हत्येचा मास्टर माईंड हा रोबोडी मधलाच असून त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी “मूक धरणे”आंदोलन करण्यांत आले. यावेळी मनसेचे पदाधिकारी तसेच राबोडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील सोमवारी राबोडी परिसरात भर दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जमील शेख याच्या डोक्यात गोळी झाडली. दरम्यान घटनास्थळीवरील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एक आरोपींला पकडण्यात आले असून हत्येचे नेमके कारण काय? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले असून जमील शेख चा खून हा क्लस्टर विरोधातून झाला आहे. यात पालिकेच्या अधिकाऱ्यांचेही चौकशी व्हावी, या हत्येचे षडयंत्र राबोडितच घडले असून मुख्य सूत्रधार ही राबोडितुन आहे. असा आरोप देखील यावेळी मनसे ठाणे पालघर जिल्ह्याध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. भर रस्त्यात झालेल्या हत्येने राबोडी परिसरात तणाव निर्माण झाला होता. हत्येमागचे कारण राजकीय आहे कि, व्यावसायिक याबाबत ठाण्यात चर्चा रंगली असून या हत्येमागचा मास्टर माईंड हा बाहेरचा नसून राबोडी परिसरातीलच आहे असा आरोप करत पोलिसांनी या सूत्रधाराला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे.
