प्रतिनिधी , जळगाव : कोणत्याही प्रकारची शहानिशा न करतांना केलेले आरोप आणि याच प्रकारातील वार्तांकनामुळे जळगावचे नाव पुन्हा बदनाम झाले आहे. सुसंस्कृत वारसा असणार्या जळगावला चुकीच्या कारणाने उजेडात आणण्याचे काम करू नका असा इशारा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिला. आशादीप प्रकरणी आपण तातडीने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांशी संपर्क करून योग्य ती चौकशी केली असून याबाबत विधानसभेतही निवेदन केल्याची माहिती देखील ना. पाटील यांनी दिली. ते आज पत्रकारांशी जळगावमध्ये बोलत होते.
