प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या संकल्पनेतुन संपूर्ण पोलीस स्टेशन मार्फत स्वाक्षरी मोहिमेची राबविली जात आहे. रावेर पोलीस स्टेशन तर्फे रावेर शहरातील विविध ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या स्वाक्षरी मोहीम मध्ये शहरातील सर्व धर्मीय लोक तसेच रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी स्वाक्षरी करत आपला सहभाग नोंदवला.
