जनतेज न्युज

जानेवारी पासुन संचार बंदीच्या नियमात बदल करा, हॉटेल चालकांची मागणी.

प्रतिनिधी , औरंगाबाद- कोरोनाच्या महामारीमुळे हॉटेल चालकांचे मोठे नुकसान झाले असुन, यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. लॉकडाउनच्या काळात हॉटेल बंद असुनही कामगारांचा पगार करावा लागला आहे. त्यामुळे हॉटेल चालकाचे उत्पन्न कमी झाले आहे. दिवाळीनंतर हॉटेल सुरळीत चालू झाले मात्र जिल्हाधिकारी यांनी औरंगाबाद शहरामध्ये रात्रीची संचार बंदी लागू केली आहे. परंतु हॉटेल चालकाचा व्यवसाय हा रात्रीला जास्त होतो. पर्यटकांना रात्रीच्या संचार बंदीमुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जानेवारीपासून नियमावलीत बदल करावा अशी मागणी हॉटेल चालकांनी केली आहे.