जनतेज न्युज

जालना:-कर्ज फेडण्यासाठी शेती साथ देत नाही,माझ्या नंतर कुटूंबाला सांभाळण्याची विनंती करून शेतकऱ्याने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या

प्रतिनिधी , जालना : कर्ज फेडण्यासाठी शेती साथ देत नाही,माझ्या नंतर कुटूंबाला सांभाळण्याची विनंती करून शेतकऱ्याने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केल्याची घटना बदनापूर तालुक्यतील हलदोला गावात घडलीय,देविदास विठ्ठल मात्रे अस आत्महत्या करणाऱ्या शेकऱ्याचे नाव असून कर्ज फेडण्यासाठी बँकेकडून होणारा तगादा,आणि खाजगी सावकाराकडून मिळणाऱ्या धमक्या याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वीच्या लिहून ठेवलेल्या चिट्ठीत मध्ये नमूद केले आहे,या सर्व प्रकारातून नेरश्यातून गेल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलत विषारी द्रव्य सेवन केल्याने त्यांना जालना येथील रुग्णालयत उपचरासाठी दाखल करण्यात आले असता उपचरादरम्यान त्यांचा मृत्यु झालाय,