प्रतिनिधी , जालना: राज्यांतील शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय ते ते विभाग स्वतंत्र निर्णय घेतील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.ते जालन्यात बोलत होते. तीन दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने स्पष्ट सूचना दिली असून कोरोनाची परिस्थिती पाहून स्वतंत्र निर्णय घ्यावा अशीही सूचना करण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली.
परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी राष्ट्रवादीला पायाखाली घालू अशी धमकी घनसावंगी येथील कार्यक्रमात दिली.हा वाद जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादीशी नसून परभणी जिल्हयातील असावा असं सांगत आपण आघाडी धर्म पाळतो असंही टोपे यांनी म्हटल आहे.
