प्रतिनिधी, सिंधुदुर्ग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मोठेपणासाठी जिल्हा रुग्णालयाच्या सेवा सरकार मोडीत काढतआहे. एन एच एम मधील १५१ कर्मचारी व अधिकारी कमी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे जिल्हा रुग्णालयाचे आरोग्य सेवाही कोलमडून गेली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे बिकट अवस्था झाली आहे त्यातच आता जिल्हा रूग्णालय सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मात्र यामध्ये जर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या तसेच या गोंधळात जिल्ह्यातील गरीब जनतेला रुग्णसेवा मिळाली नाही व त्यांचा हकनाक बळी गेला तर भारतीय जनता पक्षाच्यावतीने मोठे आंदोलन उभे करू असा इशारा भाजप नेते, प्रदेश सचिव डॉ नीलेश राणे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिला!
दरम्यान, डॉ. निलेश राणे यांनी गुरुवारी सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ मोरे यांचे जिल्हा रुग्णालयात भेट घेत या गोंधळाबात बाबतचा जाब विचारला. त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या थांबवल्या तर त्याच दिवसापासून भाजपचे आंदोलन सुरू होईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पूर्ततेसाठी जिल्हा रुग्णालयाचे सेवा कोलमडली आणि जिल्ह्यातील गोरगरिब जनतेला जिल्हा रूग्णालयाचे रुग्णसेवा ठेवा अन्यथा भारतीय जनता पक्ष म्हणून गोरगरीब जनतेच्या मागे ठाम उभे राहून आपण संघर्ष करू, असा सज्जड इशारा आहे. या भेटीदरम्यान डॉ नीलेश राणे यांनी दिला. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, जिल्हा बँक संचालक बाबा परब, आनंद शिरवलकर,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे श्रीपाद तवटे चंदन कांबळी पांडू मालवणकर देवेंद्र सामंत, अवधूत सामंत,सौ. सुप्रिया वालावलकर, सौ. स्नेहा सावंत आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
