प्रतिनिधी , नंदुरबार : कोरोनाची दूसरी लाटेमुळे नंदुरबार जिल्ह्यात जी परिस्थिति उदभवली आहे त्यासाठी जिल्हाधिकारी जवाबदार आहेत ,त्याच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिति गंभीर झाली आहे असा खनखनित आरोप खासदार हिना गावित यांनी लावला आहे.
कोरोना मुळे कोविड रुग्णालया मधे उपचार घेत असलेल्या ग्रामीण व शहरी भागातील रुग्नाना रेमडिसिवर ची नितांत आवश्यकता आहे .सुमारे अडीच हजार रेमडिसिवर इंजेक्शन उपलब्ध असताना जिल्हाधिकारी नी सदर इंजेक्शन कोविड रुग्णालयाना देण्याचे आदेश देत नसल्याने रेमडिसिवर चा तुतवड़ा निर्माण झाला आहे .जिल्ह्यात मोठ्या प्रमानात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे .दररोज रुगनसख्येत व मृत्युदरात वाढ होताना दिसत आहे या परिस्थितिला जिल्हा प्रशासन जवाबदार आहे . 10 एप्रिल रोजी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री के सी पाडवी यांनी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयात रेमडिसिवर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती याला तीन दिवस उलटल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा चिकित्सकांना रुग्णालयांना इंजेक्शन पुरवठा करण्याचे निर्देश दिले नाहीत त्यामुळे जिल्ह्यात कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे .जिल्हा रुग्णालयात रेमडिसिवर उपलब्ध असताना ते देण्याचे आदेश जिल्ह्याधिकारी देत का नाही? त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार या जिल्ह्यात सुरू आहे आणि जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीला जिल्हाधिकारी जबाबदार आहेत असा आरोप खासदार हिना गावित यांनी केला आहे…
