प्रतिनिधी , बीड : बीड जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून सायंकाळ पासून सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः थैमान घातल आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रकल्प शंभर टक्के भरले असून नदी नाले ओसंडून वाहू लागलेत. अतिवृष्टीने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. केज तालुक्यातील बनकरंजा येथील शेतकऱ्यांना वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. खरिपाचे उरले सुरलेलं पिकं मातीमोल झाले आहे.
काढणीला आलेल सोयाबीन सध्या पावसाच्या पाण्यात शेतातच तरंगत आहे. तर जनावरांसाठी चारा म्हणून पेरण्यात आलेला मका मातीमोल झालाय. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न आता निर्माण झालाय. बीड, केज, परळी, माजलगाव, गेवराई सह सर्वच भागात पावसाने झोडपून काढले आहे. शेती बरोबरच ग्रामीण भागातील जनजीवन देखील विस्कळीत झालंय. मागील महिनाभरापासून अतिवृष्टीने संपूर्ण शेती खरडून गेल्यानं शेतीचे पंचनामे झाले खरे मात्र शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. त्यामुळे आजही शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून आहे.
