प्रतिनिधी , बुलडाणा : जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी यांनी
जिल्ह्यातील 13 नगर परिषद प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी 23 फेब्रुवारी रोजी सायं 6 वाजेपासून 1 मार्च चे सकाळी 8 वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामुळे प्रतिबंधित क्षेत्रामधील सर्वच व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली असून जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या या आदेशाला
व्यापारी संघटनेने विरोध दर्शविला असून जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या हेतूने
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आदेश पारित केले आहे. ते सफल होतांना दिसत
नसल्याने आज 24 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांना चिखली व्यापारी
संघटनेच्या शिष्ट मंडळाने निवेदन देवून दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व प्रतिष्ठाने उघडी ठेवून त्यानंतर जिल्ह्यात कडक कर्फ्यु लावण्याची मागणी केली आहे…
वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील 13 ही तालुक्यात प्रतिबंधीत क्षेत्रे घोषीत केली आहे. त्यामध्ये जिवनावश्यक वस्तुंची दुकानांना सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. कोरोना
महामारीला नियंत्रणी आणण्यासाठी आपले प्रयत्न प्रशस्नीय आहे.मात्र लॉकडाऊनमध्ये देखील नागरीक मुक्तपणे फिरत आहे. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होत असतांना दिसत नाही. तर अनेक व्यापारी व व्यावसायीकांनी
बँकेकडून कर्ज घेवून आपला व्यवसाय सुरु केला आहे. त्यामुळे आम्हाला देखील
व्यवसाय करण्यासाठी दुपारी 12 वाजेपर्यंत वेळ निश्चित ठरवुन देण्यात यावे, त्यानंतर कडक कर्फ्यु लावून रस्त्यावरील नागरीकांचा मुक्त संचार थांबवावा जेने करुन कोरोना महामारीची साखळी तोडण्यास मदत होईल. आपण काढलेल्या आदेशामुळे कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल. यावेळी
जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना डिपीरोड व्यापारी असोसिएशन चिखलीचे पदाधिकारी उपस्थित होते..
