प्रतिनिधी, ठाणे : मुंब्रा येथील शाहू नगर परिसरातील रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टी धारकांना रेल्वे प्रशासनाकडून काही दिवजो पर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत तुमच्या घरावर संकट येऊ देणार नसल्याचेसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर या झोपडपट्टी रेल्वे धारकांना प्रशासनाकडून दुसऱ्यांदा नोटीस बजावत आपल्या घराच्या कागदपत्रांसह ११ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक DRM ऑफिसला पोहचण्यास सांगितले होते. त्यानुसार सर्व नागरिक हे DRM शलभ गोयल यांच्या ऑफिसमध्ये पोहचले. यावेळी या नागरिकांसाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे त्या ठिकाणी पोहचले. यावेळी आव्हाड यांनी DRM शलभ गोयल यांची भेट घेतली. नागरिकांचे असलेली कागदपत्रांनुसार हे नागरिक ३० ते ३५ वर्षापासून या ठिकाणचे रहिवाशी असल्याची बाब आव्हाडांनी गोयल यांच्या लक्षात आणून देत. ज्या जागेवर नागरिक राहत आहे ती रेल्वेची जागा नसून महाराष्ट्र सरकारची जागा असल्याची माहिती यावेळी आव्हाडांनी गोयल यांना दिली. त्यानंतर आव्हाड यांनी नागरिकांची भेट घेत माझ DRM यांच्याशी बोलणे झाले असून जो पर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत तुमच्या घरावर संकट येऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले.
