जनतेज न्युज

ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे ठरताय वरदान.. बुलडाण्यात वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न…

प्रतिनिधी , बुलडाणा : दुष्काळामुळे माणसांना जेवढा त्रास सहन करावा लागतोय, त्यापेक्षा किती तरी अधिक त्रास प्राणी आणि पक्षी सहन करत असतात. बुलडाणा जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. धरणांमध्ये जेमतेम जलसाठा झालाय. या धरणाच्या पाण्यावर वन्यजीवाची तहान भागते. ज्ञानगंगा अभयारण्यातील वनपरिक्षेत्रात ईको फ्रेंडली व कृत्रिम पाणवठे असे 86 पाणवठे बनवण्यात आले आहेत. या पाणवठ्यावर जंगलातील प्राणी तहानही भागवताना दिसत आहेत….

व्हिओ- सध्या उन्हाळ्याची दिवस सुरू झाले नजर जाईल तिकडे झाडांची गळालेली. आपण काहीही प्रयत्न करुन पाणी मिळवू शकतो, पण प्राण्यांच्या काही मर्यादा आहेत. जंगलातील पाणी संपल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण होत असतो. त्यात हे कृत्रिम पाणवठे वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरणार आहेत.मोठ्या, मध्यम तसच छोट्या धरणात जेमतेम पाणीसाठा आहे.टेकड्यावर चारा नाही.अशा भकास वातावरणात पशुपक्ष्यांना पाण्यासाठी भटकाव लागतंय.धरणाची ही विदारक स्थिती भविष्यातील बिकट संकटाची चाहूल देत आहे.बुलडाणा शहरापासून 12 किलोमीटर तर खामगाव पासून 25 किलोमीटर अंतरावर अजिंठा पर्वतरांगेत 205चौरस किलोमीटर क्षेत्रावर ज्ञानगंगा अभयारण्य विस्तारलेला आहे. येथे अस्वल,रानडुक्कर,तडस,बिबट,कोल्हे,लांडगे,रोही,ससा आणि मोर यांचा अधिवास आहे. साग,अंजन,सालई खैर यासह विविध दुर्मिळ वनस्पती आढळून येतात.समृद्ध जैवविविधता हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे.ज्ञानगंगा अभयारण्य हे अस्वलासाठी यासाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्य जवळपास 30 ते 35 अस्वल ,25ते 30 बिबट वास्तव्यास आहे.आता उन्हाळा सुरू झाला आहे.वन्यजीव विभागाकडून वन्यप्राण्यांसाठी जवळपास 86 प्रकारचे इको फ्रेंडली पाणवठे, कृत्रिम पाणवठे तयार केले आहे त्यातील काही दहा ते पंधरा पाणवठयावर सोलर पंप बसविण्यात आले आहे. हे पानवठे ऑटोमॅटिकली ते एकमेकाला इंटरकनेक्टींग केले असल्यामुळे अभयारण्यातील प्राणी गावामध्ये जात नाहीत त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होत आहे..