प्रतिनिधी , येवात्माल : नागरिकांना तत्काळ आपात्कालीन पोलिस सेवा मिळावी, यासाठी डायल 112 ही सुविधा पोलिस दलाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. परंतु, फोन करून चुकीची माहिती देण्यात येत असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पुसद येथील बालाजी हॉटेलसमोर खून झाल्याची माहिती अमर नावाच्या एका इसमाने 112 वर दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले असता, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार आढळून आला नाही. खोटी माहिती देणे अमर नामक इसमाला चांगलीच भोवली असून, वसंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
