जनतेज न्युज

डाळींबाची नीचांकी आवक……

प्रतिनिधी , कोल्हापूर : पश्चिम महाराष्ठ्रात डाळिंब खरेदी विक्रीसाठी प्रसिध्द असलेल्या पंढरपुरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज डाळिंबाची निच्चांकी आवक झाली. केवळ शंभर ते दीडशे क्रेट इतकीच आवक झाल्याने येथील कोट्यावधी रुपयांची होणारी उलाढालही ठप्प झाली आहे.
सोलापूर,पुणे, सांगली,नगरसह कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणावर येथील बाजारात डाळिंबाची आवक होते. येथे दररोज साधरणा 12 ते 14 हजार क्रेट डाळिंबाची आवक होते. यातून  येथील दैनंदिन डाळिंबाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. परंतु अतिवृष्टी,महापूर आणि सततच्या हवामान बदलामुळे डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत. परिणामी डाळिंबाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. त्यामुळे डाळिंब बाजारातही त्याचा परिणाम दिसू लागल आहे. मागील आठ दिवसांपासून येथील बाजारात डाळिंबाची आवक निच्चांकी पातळीवर आली आहे. आजच्या सौदे बाजारात केवळ दीडशे क्रेट डाळिंबाची आवक झाली आहे. आवक कमी झाल्याने डाळिंबाचे दर मात्र प्रति किलो शंभर ते सव्वाशे रुपये पर्यंत गेले आहेत. आवक कमी झाल्याने व्यापारी आणि दलालाचे मात्र हाल सुरु झाले आहेत.