जनतेज न्युज

डिझेल चोरी करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी , औरंगाबाद : पेट्रोल पंपावरुन डिझेल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. कन्नड तालुक्यातील शिवराई राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ यावरील‌ नवीन टोलनाक्यावर सापळा रचून या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यांच्याकडून एकुण ३६ गुन्हे उघडकीस आले असून तब्बल ९८ लाख ४९ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची धडक दिली स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. या कामगीरी बद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ३५ हजार रुपयांचे बक्षीस औरंंगाबाद पोलिस ग्रामीण अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी जाहीर केले आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, दि. १७ फेब्रुवारी रोजी प्रदीप प्रल्हाद राठोड यांनी पोलीस ठाणे चिकलठाणा येथे फिर्याद दिली की, त्यांच्या पेट्रोल पंपावरुन ३ लाख ४५ रुपयांचे ३ हजार ४८० लिटर डिझेल कोणीतरी अज्ञात चोरटयाने लबाडीचे इरादयाने चोरीला गेले आहे. या गुन्हयाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर गुन्हयाचे घटनास्थळास भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदार व तांत्रीक विश्लेषना आधारे माहिती मिळाली की, हा गुन्हाच उस्मानाबाद जिल्हयांतील लक्ष्मीपेढी, तेरखेडा ता. वाशी जि. उस्मानाबाद येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे रामा पान्या पवार व त्याचे साथीदारांनी केला असुन सदरची टोळी ही गुजरात राज्यातील तापी जिल्हयातून वाळू भरुन ती वाळू उस्मानाबाद जिल्हयात विक्री करतात. सदर वाळू वाहतूकीच्या ट्रकमध्ये सदरची टोळी ही वेगवेगळया पेट्रोल पंपावर जाऊन रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावरील डिझेलच्या टाकीतून प्लास्टीकच्या हातपंपाच्या साहयाने डिडोलची चोरी करुन सदरचे डिझेल ते त्यांच्या जवळील वाळू वाहतूकीच्या ट्रकमध्ये टाकून तसेच उरलेले डिझेल हे त्यांचे ओळखीचे इतर ट्रक चालक व मालक यांना स्वस्त दरात विक्री करतात, अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्नड तालूक्यातील शिवराई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ यावरील नवीन टोलनाक्यावर सापळा रचुन गुजरातकडून वाळू भरुन येणाऱ्या गाड्यांची तपासणी करीत असतांना तीन ट्रकांमध्ये अंदाजे ३५ ते ४० लिटर क्षमतेच्या वेगवेगळ्या रंगाच्या डिझेल ने भरलेल्या एकूण ४५ कॅन ४० रिकाम्या कॅन मिळून आल्या. याबाबत त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की त्यांमधील डिझेल हे चितेगाव शिवारातील पेट्रोल पंपावर चोरी केलेले आहे तसेच काही चोरी केलेले डिझेल ट्रक मध्ये टाकल्याची कबुली दिली. तसेच नेहमी चोरीचा डिझेल विक्री करणाऱ्यांना झाल्टा फाटा येथुन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
या सर्व आरोपींच्या ताब्यातुन एकुण ४ चार ट्रक, १ हजार ५४० लिटर डिझेल, ०३ हॅंडपंप, ४२ हजार ७०० रोख रक्कम, ८ मोबाईल असा एकुण ९८ लाख ४९ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या आरोपींविरुद्ध औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, खुलताबाद, कन्नड ग्रामीण, पाचोड, सोयगाव, वाळूज या पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. तसेच जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, अकोला, अमरावती, जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरुन डिझेल चोरीची कबुली दिली आहे. या आरोपींकडून एकुण ३६ डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून अजुनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.