जनतेज न्युज

डेंजर झोन मधील गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

प्रतिनिधी , डेंजर झोन मधील गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वाई तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिली यावेळी डेंजर झोन मधील गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे सांगत पहिल्यांदाच महाराष्ट्रात जास्त बळी गेले आहेत.. साताऱ्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या असून राज्य सरकारने नियम बदलून नुकसानग्रस्त नागरिकांना पॅकेज देण्याची मागणी आठवले यांनी केली आहे..
नदी जोडण्याचा कार्यक्रमाला महत्व द्यावे लागेल.. तसा आराखडा करणे गरजेचे आहे तसा केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे आठवले यांनी सांगितले..
मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर परत गेले तसे आले पण पाहिजे.. मुख्यमंत्र्यांनी एका ठिकाणी तरी भेट देणे गरजेचे असल्याचे यावेळी बोलताना सांगितले..
बारामतीने अनेक लोकांना न्याय दिला आहे.. बारामतीला पण मी न्याय दिला असल्याचे सांगत शरद पवारांच्या चाणक्यनीतीचे एकप्रकारे कौतुक केलंय..
कोकणात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नुकसानग्रस्त महिलेशी उद्धट वर्तन केलं यावर बोलताना आठवले म्हणाले जाधव यांनी असे करायला नको होते सांगत नाराजी व्यक्त केली..
मोदी सरकारने कॅबीनेट पद दिल नाही यावर असमाधानी आहात का असे विचारले असता.. मला मिळालेल्या राज्यमंत्री पदासाठी मी समाधानी असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले..
मंत्री आठवले यांना पावसावर काय कविता करणार विचारले असता रामदास आठवले म्हणाले.. मी देत आहे सगळ्या पाहाडांना ‘आरोळी’.. पण मी आज करणार नाही माझ्या कवितेची ‘चारोळी’