कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील चैत्यभूमीवर न जाता आपापल्या गावात, शहरात, जिल्ह्यात एक वही एक पेन अर्पण करून धुळे शहरातील महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या पुतळा येथे अनोखे अभिवादन करण्यात आले.
प्रतिनिधी , धुळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येताना फुल हार, मेणबत्ती हे नाशवंत वस्तू न आणता “एक वही एक पेन” आणून बाबासाहेबाना अनोख्या पद्धतीने अभिवादन करावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष, धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते. त्या आवाहनास धुळेकर नागरिकांनी तसेच आंबेडकरी अनुयायांनी उदंड प्रतिसाद देत हजारो वह्या आणि पेन जमा करून ह्या सामाजिक उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. तसेच जमा झालेले साहीत्य समाजातील उपेक्षित, गरीब, कष्टकरी आदीवासी विद्यार्थी यांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती धुळे जिल्हाध्यक्ष विशाल पगारे यांनी दिली.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या, धुळे शहराचे आमदार डॉ फारुख शहा, धुळे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय बच्छाव, शहर पोलिस स्टशन चे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले, महेंद्र शिरसाठ, वंचित बहुजन आघाडीचे राज चव्हाण, धुळे मनपाचे स्थायी समिती सभापती सुनील बैसाने, आरपीआय चे शशिकांत वाघ, सामाजिक कार्यकर्ते अरुण तायडे, आदींनी वही, पेन देऊन कार्यक्रमाची सुरवात केली.
या अभियानाला यशस्वी करण्यासाठी रिपाई खरात पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किरण इशी, जिल्हाध्यक्ष विशाल पगारे, शहर अध्यक्ष नागिंद मोरे, सुगत मोरे, इंद्रजित कर्डक, निशांत पाटोळे, शुभम खैरनार, भैया खरात, दाऊद शेख, पिंटू पवार, राहुल पवार, सचिन खरात, रोहित म्हासदे, समाधान भामरे, यश म्हस्के, वृंदावन पवार, विजय पगारे, पराग वाघ, विक्की जोंधळे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
