प्रतिनिधी , मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज क्रांती दिनी डोंबिवलीमध्ये मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो नागरिक व प्रकल्प ग्रस्त, भूमिपुत्र या मशाल मोर्चात सहभागी झाले होते. मशाल मोर्चा डोंबिवली येथील मानपाडाश्वर मंदीर शिव मंदिर मधुन सुरुवात झाली असून मानपाडा श्वर मंदिराच्या परिसराच्या आजूबाजूच्या गावां मधून हातात झेंडे घेऊन नारेबाजी करत गावागावातून मशाल मोर्चा काढण्यात आला यावेळी या मोर्चात महिलांनीही सहभाग घेतला असून या आधी काढण्यात आलेले सर्व आंदोलन हे शांतीच्या मार्गाने असून यापुढे दीपा पाटील यांचे नाव दिले नाही तर विमानतळावर ती सुरू असलेले काम बंद करण्याचा इशारा कार्यकर्त्यां कडून देण्यात आला
