जनतेज न्युज

डोंबिवलीत शिवसेनेकडून प्रदूषणाची पोलखोल एमआयडी आणि कंपन्या जबाबदार राजेस कदम यांचा आरोप,,

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : मुख्यमंत्री शिवसेनेचा , परियावरण मंत्री शिवसेनेचा पालकमंत्री शिवसेनेचा ,डोंबिवली चे खाजदर शिवसेनेचे आहे तरीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ही पोलखोल करून या वर आता कारवाई करणार कोन ?
कोरोना काळात टाळेबंदीमुळे कारखाने बंद होते. आता अनलॉकपासून हळूहळू कारखाने सुरू झाल्यावर डोंबिवलीतील प्रदूषणाची समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यामुळे एमआयडीसी लगतच्या नागरी वसाहतीला आजही धोका कायम आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी उपाययोजनेचे कागदी घोडे नाचवत आहेत. तर लोकप्रतिनिधीही प्रदूषणाच्या मुद्द्यावर एकमेकांवर कुरघोडी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.यातच शिवसेनेचे राजेश कदम यांनी त्यांच्या कार्यकत्र्यासह प्रत्यक्ष पाहणी करत प्रदूषण होत असल्याची पोलखोल व्हीडीओ द्वारे केल्याने शिवसेनेला घरचा आहेर मिळाला आहे .
डोंबिवली एमआयडीसी परिसर प्रदूषणामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. 2014 साली या परिसरात हिरवा पाऊस पडला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात प्रदूषित सांडपाण्यामुळे रस्ता गुलाबी झाला होता. तर गेल्याच आठवड्यात रस्त्यावर रासायनिक निळे पाणी पाहून परिसरात घबराट पसरली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या डोंबिवली दौऱ्यानंतर सुरक्षिततेची उपाययोजना न करणाऱ्या 302 कारखान्यांची पाहणी करण्यात आली होती. त्यापैकी आौद्योगिक सुरक्षिततेची तपासणी न करणाऱ्या 38 कारखानदारांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने पुढील कारवाई थंडावली. कोरोना काळात टाळेबंदीमुळे कारखाने बंद होते. आता अनलॉकपासून हळूहळू कारखाने सुरू झाल्यावर डोंबिवलीतील प्रदूषणाची समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यामुळे एमआयडीसी लगतच्या नागरी वसाहतीला आजही धोका कायम आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी उपाययोजनेचे कागदी घोडे नाचवत आहेत. तर लोकप्रतिनिधीही प्रदूषणाच्या मुद्द्यावर एकमेकांवर कुरघोडी करीत असतानाच शिवसेनेचे राजेश कदम यांही एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्याकडून कशा प्रकारे रासायनिक प्रदूषित सांडपाणी सोडले जात याचे व्हिडीओ करून या कंपन्यांची पोलखोल केली आहे मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचा , परियावरण मंत्री शिवसेनेचा डोंबिवली चे पालकमंत्री शिवसेनेचा ,खाजदर शिवसेनेचा आहे तरीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करावे लागते त्यातच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ही पोलखोल करून या वर आता कारवाई करणार कोन ? अशे प्रश्न उपस्थित होत आहे