जनतेज न्युज

डोमेस्टिक गॅस सिलेंडर मधून गॅस  चोरी 

 प्रतिनिधी , पिंपरी – चिंचवडमध्ये डोमेस्टिक गॅस सिलेंडर मधून गॅस  चोरी  घटनांचा अगदी सुकाळ असती अशातच आता सामाजिक  सुरक्षा  विभागाने  आणखी एक घटना उघसकीस आणली आहे.
 

डोमेस्टिक गॅस  सिलेंडर  मधून  कमर्शियल गॅस सिलेंडर मध्ये गॅस भरून त्याच काळाबाजार करणारी  टोळी सामाजिक सुरक्षा पथकाने गजाआड  केली आहे . पिंपरी  – चिंचवड शहरातील कांकरिया एच पी गॅस एजन्सी, देगलूरकर भारत गॅस एजन्सी आणि वंदना भारत गॅस एजन्सी मधून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर घेऊन ते कमर्शियल गॅस सिलेंडर मध्ये भरले जात आहेत.
मुख्य आरोपी बन्टु सिंह यांच्या सह 12 जणांवर सामाजिक सुरक्षा  विभाग पोलिसांनी भोसरी पोलीस  स्टेशन  ६ लाख  ९७ हजार ९९४ रुपयाचा  मुद्देमाल  जप्त  केलाय