जनतेज न्युज

ड्राय रन सुरवात!!!

प्रतिनिधी , कोल्हापूर : कोरोनाचा प्रकोप थांबवण्यासाठी आज राज्यभरात ड्राय रन सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात याला सुरुवात झाली असून जिल्ह्यात चार ठिकाणी ही लस दिली जाणार आहे. सुरवातीच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रात पंचवीस कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्वाना ही लस देण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
या ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. कोविन ॲपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाच्या माहितीची नोंद ॲपमध्ये करण्यात येईल. कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना कोरोनासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या जात आहे.