जनतेज न्युज

ढगाळी वातावरणाचा तुरीला फटका : राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा.

प्रतिनिधी , यवतमाळ : यवतमाळ शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात आता ढगाळी वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या वातावरणाचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसणार आहे.
खरीप हंगामातील कपाशी आणि सोयाबीन पिकाने दगा दिला. शेतकऱ्यांनी लागवड केलेला खर्च निघाला नाही. तूर पिकाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र,ढगाळी वातावरण असल्याने त्यालाही फटका बसणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे झाले आहे.