जनतेज न्युज

तळकोकणातील कायम चर्चेत राहिलेला विमानतळ म्हणजे चिपी विमानतळ.

प्रतिनिधी ,तळकोकणातील कायम चर्चेत राहिलेला विमानतळ म्हणजे चिपी विमानतळ. हे विमानतळ कोणी आणलं, कोणी बांधून पूर्ण केलं यावरून सेना, भाजप आणि काँगेसने श्रेयवाद घेतला जात आहे. येत्या ९ ऑक्टोबर ला केंद्रीय हवाई उडान मंत्री जोतीराधीत्या सिद्धीया आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. मात्र चिपी विमानतळ हे सागरी महामार्गालागत आहे. तिथुन मुंबई गोवा महामार्गला जोडणारा रस्ता पुर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना खड्ड्यातून मार्ग काढत जावं लागतं आहे. सत्ताधारी या रस्त्यासाठी ३८ कोटीचा निधी उपलब्ध केल्याचं सांगत आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी योग्य वेळी रस्ता पूर्ण करू अस म्हटलं आहे. मात्र सध्या ये जा करण्यासाठी वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. उद्या विमान सेवा सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर येणाऱ्या पर्यटकांनाही याचं खड्ड्यातुन प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे हा रस्ता सुरळीत केव्हा होईल आणि विमानाने जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरळीत रस्ते केव्हा मिळतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित असलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाला आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडच्या एसपीव्हीला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडून (डीजीसीए) चिपी विमानतळासाठी चालन परवाना प्राप्त झाला आहे. या एरोड्रोम लायसेन्समुळे आता चिपी विमानतळ एयरलाईन्स आणि सर्वसामान्य जनतेसाठी खुला करणे कंपनीला शक्य होईल. आयआरबी इन्फ्रा च्या एसपीव्ही कंपनीने विकसित केलेला हा पहिला ग्रीनफील्ड एयरपोर्ट प्रकल्प आहे. कोकण संपूर्ण देशासोबत जोडले जाण्यासाठी चिपी विमानतळ खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हा प्रकल्प कोकणात आर्थिक सुबत्ता येण्यासाठी आणि स्थानिकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.