जनतेज न्युज

तासगाव कारखान्याच्या थकीत उस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

प्रतिनिधी, सांगली : तासगाव कारखान्याच्या थकीत उस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज बुधवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला
दरम्यान आजच बुधवारी 3 कोटी 15 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी वर्ग केले यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांना 70 टक्के बिले मिळाली उर्वरित 30 टक्के बिल आणि 15 टक्के व्याज येत्या महिन्याभरात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करू अशी ग्वाही तहसीलदार रांजणे यांनी दिली
मोर्चाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून झाला छत्रपती शिवाजी महाराज की जय , ऊस बिल आमक्या हककाचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतोय देत नाही घेतल्याशिवाय रहात नाही, घामाचे दाम मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत मोर्चा गणपती मंदिर मार्गे तहसीलदार कार्यालयासमोर आला या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले.
आंदोलकासमोर बोलताना जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले खा संजयकाका पाटील यांच्या तासगाव आणि ना गेवाडी कारखान्याची ऊस बिले थकीत होती यासाठी वर्षभर आंदोलन सुरू आहे आता पर्यंत 50 कोटी शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात संघटनेला यश आले आहे आज तीन 15 लाख वर्ग झाल्यानंतर 53 कोटीची बिले वसूल करणे संघटनेला शक्य झाले आणखी तीन कोटी रुपये येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्याची ग्वाही तहसीलदारांनी दिली आहे त्यानंतर व्याज आणि राहिलेली दहा टक्के रक्कम जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वर्ग होतील 15 टक्के व्याजासहित 100 टक्के रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जो पर्यंत वर्ग होत नाहीत तो पर्यंत हा लढा थांबणार नाही शेतकऱ्याची पै न पे वसूल केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत संघटनेचे उमेदवार असणार आहेत या उमेदवाराच्या कडे पैसे नसतील, ते दारू, चिकन, मटण, श्रीखंड, गांधी बाबा देवू शकणार नाहीत पण ते तुमच्या न सुटणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मात्र ते हजर असतील त्यामुळे त्याच्या पाठीशी रहा उस बिलाला संघटना, दूध दरासाठी संघटना, वीज कनेक्शन तोडले की संघटना, जप्तीची कारवाई झाली की संघटना मताला मात्र संघटनेला शेतकरी विसरतात हे वास्तव आहे या पुढे वजनातील काटा मारी आणि तोडीचे पैसे देण्याची पद्धत बंद करण्यासाठी संघर्ष केला जाईल त्यासाठी तयार रहा त्याच बरोबर केन अग्रो व गुरुदत्त या कारखान्यावर ही बिलासाठी लवकरच मोर्चा काढला जाईल असा इशारा खराडे यांनी दिला यावेळी राजेंद्र माने गुलाब यादव भुजंग पाटील संदीप शीरोटे महेश जगताप विजय रेंडळकर, सरदार सावंत, रघुनाथ पाटील, राजेंद्र शेंडगे ,विठ्ठल पाटील, सुरेश पाचीब्रे, चंद्रकांत सुतार,चंद्रकांत शेंडगे, रवी पाटील, शाम पवार, प्रतीक पाटील, अनिल वाघ, दीपक पाटील, निशिकांत पोतदार , उत्तम चंदनशिवे, विशाल जमदाडे, समीर तांबोळी, संपतराव पाटील, विजय माने, निवास पाटील, अर्जुन हजारे, निवास एडके,विठ्ठल मोरे, तानाजी पाटील, अशोक पाटील, पंढरीनाथ जाधव, श्रीकांत गुरव, गौस मुलाणी, हमीद मुलाणी संदीप जाधव, प्रमोद शेटे , जालिंदर जाधव, प्रवीण उर्फ बंडा पाटील आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.