प्रतिनिधी, यवतमाळ : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात एक हजार ५४ इलेक्ट्रॉनिक्स तिकीट इश्यू मशीन (ईटीआयएम) आहेत. मात्र, बॅटरी चार्जिंग व की-पॅड टच न होणे, वारंवार हँग होऊन काम न करणे या कारणांनी ७५६ अर्थात ७० टक्के ईटीआयएम बंद आहेत. म्हणून वाहकांच्या हातात पुन्हा तिकिट ट्रे देण्याची वेळ आली आहे. एसटी महामंडळाला वर्षाकाठी लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे लागत होते. यावर उपाय म्हणून परिवहन विभागाने ईटीआयएम मशीनच्या सहाय्याने तिकीट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार लाखो रूपये खर्चून मशिन खरेदी करून प्रत्येक आगाराला उपलब्ध करून देण्यात आल्या. गेल्या काही वर्षांत हजारो मशिनमध्ये बिघाड झाला. ईटीआय मशीनचा या काळात वापर झाला नाही. आता सध्या ७० टक्के मशीन नादुरुस्त आहेत. मात्र यासंदर्भात वरिष्ठांना अधिकाऱ्यांसोबत विचारणा केली असता वरिष्ठ अधिकारी कोणी कॅमेरा समोर बोलायला तयार नाही वाहकांना पुन्हा तिकीट ट्रेचा वापर करावा लागतो. त्यामुळे कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.
