जनतेज न्युज

थकबाकीदारानी अभय योजनेचा लाभ घेत 31 डिसेंम्बर पर्यंत कराचा भरणा करावा – पालिका प्रशासनाचे आवाहन

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेकडून थकित मालमत्ता कर धारकांसाठी अभय योजना 2020 लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत चालू वर्षाच्या मागणीसह दंडाची 25% रक्कम एक रकमी भरल्यास व्याजाच्या रकमेतून 75 टक्के सूट दिली जाणार आहे ही योजना 31 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार असून वर्षानुवर्षाची थकबाकी असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. देशभरात पसरलेल्या करुणा महामारी मुळे पालिका प्रशासन मालमत्ता कराची सक्तीने वसुली करू शकत नाही यामुळे मालमत्ता कर धारकांनी या योजनेचा लाभ घेत मालमत्ता कर भरणा करावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे