प्रतिनिधी , प्रतिवर्षी 12 डिसेंबर हा दिवस स्व.गोपीनाथराव मुंडेंचा वाढदिवस म्हणून गोपीनाथ गडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही कार्यक्रम होणार नाही.अशी माहिती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिलीय.
त्या मुंडेंभक्तांना आवाहन करतांना म्हणाल्या ,की यंदा सर्व सामान्य जनता कोरोनाच्या संकटात सापडली आहे.अशा परिस्थितीत कोणालाही त्रास न होता वेगळ्या पध्दतीने १२ डिसेंबर हा दिवस साजरा करायचा आहे.मोठे नेते, मोठी सभा, गर्दी टाळायची आहे.मी स्वतः १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर सकाळी ११ ते २ वा. पर्यंत उपस्थित राहणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून सर्वांनी गडावर दर्शन घ्यायचे आहे.सर्वांनी १२ ते १५ डिसेंबर दरम्यान केवळ रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत.असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
