जनतेज न्युज

दलित अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ सरकार बरखास्तीची राष्ट्रपतींकडे मागणी

प्रतिनिधी , पुणे : उत्तर प्रदेश येथील वाढत्या जाती अत्याचाराच्या घटना रोखण्यात सरकारला पुर्णतः अपयश आलेले आहे किंबहुना दलित अत्याचाराच्या आरोपींना सरकार पाठीशी घालत आहे. आणि या घटनांवर आवाज उठवणाऱ्या राजकीय व सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकारांवर उत्तर प्रदेश सरकार गंभीर स्वरुपाची गुन्हे दाखल करुन त्यांच्यावरच अटकेची कारवाई करत असल्याने उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी निदर्शनांच्या आंदोलनाद्वारे रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते मा.राहुल डंबाळे यांनी राष्ट्रपती राम नाथ कोंविद यांच्याकडे केली आहे.
उत्तर प्रदेश हाथरस येथे १९ वर्षीय दलित समाजाच्या तरुणीचा सामुहिक बलात्कार करुन तिने याची वाच्यता कोठेही करु नये म्हणून तिची जिभ देखील या नराधमांनी छाटली होती. उत्तरप्रदेश सरकारने उपचारामध्ये केलेली दिरंगाई यामूळे सदर युवतीला आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. यामूळे उत्तरप्रदेश सरकार विरोधात देशभर संतापाची लाट उसळलेली आहे. यापुर्वी देखील उत्तर प्रदेश या ठिकाणी अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या असताना यातील आरोपींना कठोर कारवाई करण्या ऐवजी या घटनांवर आवाज उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना पत्रकारांना रासूका सारख्या गंभीर गुन्हयात अटक केली जात आहे. यामूळे जातिवादी वृत्तीच्या नराधम व्यक्तींचे मनोबल वाढले असून ते राजरोषपणे अत्याचार करत आहेत. अशा घटनांना आळा बसण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करण्याचे आवश्यक असल्याचे आज रिपब्लिकन युवा मोर्चा व मेहत्तर बाल्मिकी महासंघ, पुणे यांच्या आंदोलनाद्वारे दर्शविण्यात आले आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या निदर्शनाच्या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (A) नेते सिद्धार्थ धेंडे ,
रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा सुवर्णाताई डंबाळे, भीम आर्मीचे दत्ता पोल, भिमछावा संघटनेचे शामभाऊ गायकवाड, मेहत्तर बाल्मिकी महासंघाचे कविराज संघेलिया, मोहन चव्हाण, विजयकुमार जाधव, चंद्रकांत चव्हाण, किशोर रजपूत, किशोर वाघेला, विनोद निनारिया, मनोज पटेलिया, प्रमोदजी राणा, राजेश बडगुजर, सुरेश झेंड्न्झा, योगेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या आरतीताई जमदाडे, संतोष डंबाळे, स्नेहलताई कांबळे, अमोल डंबाळे.
इत्यादी मान्यवर सहभागी होते.