प्रतिनिधी , भंडारा : भंडारा जवळील बेला येथील कारेमोरे सभागृहातुन दागीणे असलेली पर्स चोरी करणा-या चोरट्याला भंडारा पोलीसांनी अटक केली असुन विवेक रंधीर सीसोदीया वय २२ वर्ष रा.कडीया (सासी)ता.पचोर जि.राजगड असे चोरट्याचे नाव असुन त्याच्या ताब्यातुन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि.१६ डिसेंबर रोजी बेला येथील कारेमोरे सभागृहात साक्षगंधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमात नुतन बारापात्रे र्यंची सोन्या चांदीचे दागीणे व रोख रक्कम असा एकुण ८९ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल असलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार भंडारा पोलीस स्टेशन मध्ये नोंदविण्यात आली होती.
तपासा दरम्यान पोलीसांना सदर चोरीच्या गुन्ह्यात मध्यप्रदेशातील राजगड जिल्हयातील आरोपंीचा सहभाग असल्याचे दिसुन आले.त्यानुसार भंडारा पोलीस निरीक्षक लोकेश कणसे यांनी एक पथक तयार करून त्यांना रवाना करीत आरोपी विवेक रंधीर सीसोदिया वय २२ वर्षे रा.कडीया याला ताब्यात घेत चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला.
