प्रतिनिधी , अमरावती: राज्यात दारूचे दुकान सुरू आहे पण मंदिर बंद आहे हे सरकार उलट्या डोक्याचे असून येणाऱ्या काळात लोक धडा शिकवतील असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे लावला. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन गेटवरून घेतले त्यानंतर ते बोलत होते के तुळजापुरला सुद्धा मंदिर उघड़न्यासाठी अनेक साधू महंत आंदोलन करीत आहे त्यांना अडविन्यासाठी पोलिसांचा पूर्ण फौजफाटा लावला ते काय आतंकवादी आहे का असेही त्यांनी यावेळी सरकारला विचारले
