प्रतिनिधी , मुंबई : दिल्ली सिमेवरील शेतकरी आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले. पण देशाच्या अन्नदात्याबाबत केंद्र सरकार जणू संवेदनशून्य झाले आहे. केंद्राचे तीनही काळे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. यासाठी आज कॉंग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी प्रमारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मुंबईची स्थिती बिकट नाही. मात्र, अजून कठोर निर्बंध लावून आपण लॉकडाऊन लावण्यापासून दूर राहू शकतो. त्यामुळेच निर्बंध कठोर करण्यात येतील. लसीकरणाचा कार्यक्रम योग्य पद्धतीनं सुरू आहे. मात्र, अजूनही काही लोकांमध्ये थोडा संभ्रम आहे. लसीकरणाबाबत घाबरुन न जाता डॉक्टरांना योग्य प्रतिसाद देण्याची गरज आहे’, असंही लॉकडाऊनबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना शेख यांनी म्हटलं.
