प्रतिनिधी , जालना : दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या म्होरक्यास जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मध्यप्रदेशातील इंदौर मधून अटक केलीय.पवन उर्फ भुरा रामदास आर्या असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.काही दिवसांपूर्वी जालना शहरात भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते.या चोरीप्रकरणाचा तपास करत असताना मध्यप्रदेशातील इंदौर येथील आरोपी भरदिवसा घरफोडी करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी इंदौर येथे जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.आरोपीने जालना शहरात काही दिवसांपूर्वी ३ ठिकाणी चोरी केल्याचं कबूल केलं असून नगर,जळगाव,बुलडाणा,सांगली,कोल्हापूर, बीड,कर्नाटक, या ठिकाणी देखील चोरी केल्याचं कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
