प्रतिनिधी, सोलापूर : सोलापुरात आज राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपली चाकणकर यांचा देखील दौरा आहे, माध्यमांशी बोलत असताना दिशा सालीयन केस प्रकरणातला सविस्तर अहवाल मालवण पोलिसांना सादर करण्याचे निर्देश दिल्याचे रुपाली ताई चाकणकर यांनी म्हंटले आहे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या केसप्रकरणात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती त्याची दखल घेत चाकणकर यांनी सविस्तर अहवाल 48 तासात सादर करण्याचे पोलिसांना निर्देश दिलेत, तसेच राजकारणात आरोप प्रत्यारोप करताना प्रत्येकाने भान राखलं पाहिजर तसेच कुणाचा अपमान होऊ याची देखील काळजी घ्यावी असाही त्या यावेळी म्हटल्या.
