प्रतिनिधी , मुंबई : दिल्लीत झालेल्या घटनेत भाजपचा हात होता हा आरोप शंभर टक्के बरोबर आहे. आम्ही आधीपासून सरकारला सांगत होतो की, अशा प्रकारे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करु नका पण सरकारने आमच ऐकल नाही. अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे.
तसेच देशाचे राष्ट्रपती हे शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणतात ही बाब अत्यंत चुकीची असून शेतकरी अन्न पिकवून सगळ्यांचे पोट भरतो त्याची ही परफेड करत आहात का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. लाल किल्यावरील प्रकाराती व्यक्तीही शेतकरी नसून त्या व्यक्ती सोबत पंतप्रधान आणि गृह मंत्र्यांचे फोटो आहेत असंही ते म्हणाले.
शेतकरी आंदोलनावर बोलतांना ते म्हणाले की, शेतकरी आंदोलन अजून चालूच असून आम्ही या सरकारला नक्कीच गुडघे टेकायला लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
