प्रतिनिधी , बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यातील अत्यंत महत्वाची समजली जाणारी सैलानी येथील यात्रा ची 25 मार्च पासून भरते. ही यात्रा कोरोनाचा वाढत प्रदूर्भाव लक्षात घेता या वर्षीची ही सैलानी यात्रा रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध असणारी सैलानी यात्रेचे आयोजन 25 मार्च ते 5 एप्रिल 2021 या कालावधीत करण्यात येत असते. या यात्रेमध्ये देशातील अनेक राज्यांतून 5 ते 6 लक्ष भाविक दाखल होत असतात. यात्रेमध्ये जमणाऱ्या जनसमुदायामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन कोविड 19 या साथरोगाचा फैलाव होवू नये म्हणून सैलानी यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी एस.राममुर्ती यांनी काढले आहे.विशेष म्हणजे येथे होळी च्या दरम्यान लाखो नारळाची होळी आणि संदल हे महत्वाचे उत्सव असते ही यात्रा पंधरा दिवस चालत असते.
