प्रतिनिधी , धुळे : धुळे तालुका पोलीस अधिकाऱ्यांना गुप्त माहिती दाराकडून मिळालेल्या माहितीनुसार धुळे तालुक्यातील नेर गावामध्ये पंकज चौधरी या इसमाकडे काही जिवंत काडतुसांसह अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळाली होती. धुळे तालुका पोलिसांनी तात्काळ माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता सदर इसमाकडे दोन अग्नीशस्त्र व 4 जिवंत काडतूस पोलिसांना आढळून आले आहे.
धुळे तालुका पोलिसांनी सदर पंकज चौधरी या इसमास ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील अग्निशस्त्र व जिवंत काडतूस देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ताब्यात घेतलेल्या इसमाची पुढील तपासणी धुळे तालुका पोलीस करीत असून या इसमाने अग्निशस्त्र कोणाकडून व कुठल्या कारणासाठी घेतले यामागे काही घातपाताचा देखील कट आहे का या सर्व बाबींची चौकशी आता धुळे तालुका पोलिस करीत आहेत.
