जनतेज न्युज

दोन गावठी पिस्टल एक गावठी कट्टा व सहा राऊंड असे मिळून 136200 रुपयेचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी , पुणे : खराडी गाव ते दर्गा रोड बाप्पू ढाब्याच्या अलीकडे खराडी येथे दोन इसम पिस्टल सहित आले असल्याचे बातमी दरोडा व वाहन चोरी पथक 2 गुन्हे शाखा पुणे शहर चे पोलिस मनोज खरपुडे व दीपक लांडगे यांना मिळाल्याने मा.पोलिस उप आयुक्त श्री.बच्चन सिंग गुन्हे शाखा यांच्या माग॔दश॔नाखाली मा.पोलिस निरीक्षक पंधरकर,पो.हवा.लोखंडे, पो.हवा.काळभोर,पो.हवा.लांडगे, पो.हवा.शिंदे,पो.ना.खरपुडे यांनी लागलीच स्टाफसह व पंचासह बातमीप्रमाणे घटनास्थळी रवाना होऊन सदर दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी पिस्टल एक गावठी कट्टा व सहा राऊंड असे मिळून आले समक्ष पंचनामा करण्यात येऊन वरील एकूण मुद्देमाल 136200 रुपयेचा जप्त करून सदर दोन इसम नामे समाधान लिंगप्पा विभुते वय 28 वर्ष राहणार बाबू केसनंद रोड हॉटेल ग्रीन व्हिला हॉटेल समोर वाघोली नंबर 2 गोपाल रमेश मुजमुले वय 21 वर्ष धंदा डिलेवरी बॉय राहणार खांदवे नगर त्रिमूर्ती जिम च्या पाठीमागे पुणे वरील दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन त्यांचेवर चंदन नगर पोलिस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे