जनतेज न्युज

द कुटे ग्रुपचे सामाजिक दायित्व; गरजूंना दिला मदतीचा आधार

प्रतिनिधी, बीड : बीड जिल्ह्यात द कुटे ग्रुप च्या माध्यमातून नेहमीच गरजूंना आधार दिला जातो. दरम्यान आज कुटे ग्रुपचे आधारवड स्वर्गीय ज्ञानोबाराव कुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ सामाजिक उपक्रम म्हणून जिल्ह्यातील गरजवंतांना मदत देण्यात आलीय. यामध्ये 20 शालेय विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप, गरजू आणि विधवा महिलांना उपजीविकेचे साधन म्हणून बारा महिलांना शिलाई मशीनचे वाटप तर ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशांअभावी थांबले आहे. त्यांना आर्थिक मदत देण्यात आलीय. कुटे ग्रुपच्या सामाजिक दायित्वमुळे या गरजवंतांना मोठा आधार मिळाला आहे.