जनतेज न्युज

धनंजय मुंडेंचा विषय हा राजकीय नसुन कौटुंबिक – संजय राऊत

प्रतिनिधि , मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवरुन राजकिय वर्तुळात एकचं खळबळ उडाल्याचे चित्र दिसुन येत आहे. याबात शिवसेना नेते संजय राऊत यांना याबाब विचारले असता, त्यांनी यावरुन धनंजय मुंडेंची एकप्रकारे पाठराखन केल्याचे निदर्शनास आहे. धनंजय मुंडे यांना विषय हा राजकिय नसुन कौटुंबीक असल्याच राऊत यांनी सांगितल. त्याबरोबरच मुंडेंमुळे महाविकास आघाडी सरकार अजिबात अडचणीत येणार नाही असही ते म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसते जेष्ठ नेते हे निर्णय घ्यायला सक्षम असुन ते योग्य निर्णय घेतील. त्यामुळे या प्रकरणाला कोणीही राजकिय रंग देऊ नये अस आवाहन त्यांनी केले.
शेतकरी कायद्यावर बोलतांना ते म्हणाले की, शेतकरी सरकार कडे गेले होते. त्यामुळे सरकार ने एक पाऊल पुळे याव आणि हा तिढा सोडवावा. त्याने सरकार वर काही आभाळ कोसळणार नाही, आणि सरकार ची कोणती प्रतिमाही मलीन होणार नाही. उलट त्याने सरकार ची प्रतिमा सुधारेल. असही ते म्हणाले.