प्रतिनिधी , शेवगाव : धनगर समाज शेवगाव तालुका यांच्यावतीने तहसीलदार अर्चना पागिरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने धनगर समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे, मुंबई उच्च न्यायालयात आरक्षण याचिका धनगर समाजाच्या वतीने दाखल असून या याचिकेची सुनावणी जलदगतीने न्यायालय व्हावी, सरकारने धनगर समाजासाठी जाहीर केलेले आदिवासींच्या सवलती त्वरित लागू करून मंजूर केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या निधींची तात्काळ तरतूद करावी, धनगर समाजातील मेंढपाळांवर हल्ले थांबवण्यासाठी कडक कारवाई करावी व मेंडपाळांना संरक्षण द्यावे इत्यादी मागण्यांचे निवेदन सकल धनगर समाज शेवगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी जनशक्ती विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते जगन्नाथराव गावडे, रा.स.प.चे तालुकाध्यक्ष आत्माराम कुडकर ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक निवृत्ती दातीर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नबाबत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक भाऊसाहेब कोल्हे, नगरसेवक गणेश कोरडे,अजय नजन,विनायकराव नजन,सरपंच बबनराव भुसारी,गणेश खंबरे,नवनाथ तागड,धर्मराज तागड,पाराजी वाघमोडे,मल्हारी नजन,नवनाथ गाढे, काकासाहेब सुडके,विष्णू सुडके,श्रीधर सुडके, गोरख कर्डिले,डुक्रे मिस्तरी,पोपट राशिनकर,प्रताप घाडगे आदी समाज बांधव उपस्थित होते
