जनतेज न्युज

धुळे जिल्ह्यातील रेशन दुकानाला अप्पर तहसीलदाराणे केले सील.

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात रात्रीच्या सुमारास स्वस्त धान्य दुकानातून वाहनाच्या मदतीने रेशन दुकानातील गहू विक्रीसाठी जात असल्याचे निदर्शनास आल्याने तहसीलदार प्रवीण चव्हाण के व अप्पर तहसीलदार विनायक थविल यांनी दोन स्वस्त धान्य दुकान सील करीत दोन आरोपी विरोधात पिंपळनेर पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिनिधी , धुळे : अप्पर तहसीलदार विनायक थविल रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गस्त घालीत असताना माळी गल्ली पांझरा नदी काठा जवळील स्वस्त धान्य दुकाना जवळ वाहन उभे पाहून तेथील हालचाली पाहता अपर तहसीलदार विनायक थविल यांनी जवळ जाऊन पाहिले असता वाहनात रेशनच्या गोण्या भरून काळ्याबाजारात विक्री साठी जात असल्याचे निदर्शनास आल्याने समजताच तात्काळ अप्पर तहसीलदार थविल यांनी पुरवठा अधिकारी श्रीमती एस जे बागूल यांना बोलावून त्वरित मालाचा पंचनामा करण्यास सांगितले, स्वस्त धान्य दुकान क्र. १३ प्रगती महिला बचत गट असे असून रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता, रात्रीच्या सुमारास या वाहनातून रेशनचामाल नेण्यात येत होता सदर माल वाहन क्र. एम एच १८ – एए ४३१२ मधे ३५ गोणी गहू व एक तांदुळाची गोण असा मुद्देमाल होता, अधिकारी कारवाई पाहून सदर गाडी चालक हा तेथून फरार झाला व गाडीदेखील पंचर होती, गाडी चालक गाडीची चावी नसल्याने व गाडी चालक फरार झाल्याने तसेच गाडी रात्री नेणे महिला कर्मचाऱ्याला शक्य झाले नाही, गाडी पॅक करून पुरवठा अधिकारी तेथून निघून गेल्यात, पण सकाळी येऊन पहिले असता, दुकानाबाहेर पंचनामा केलेली गाडी उभी नव्हती, सदर मला हा पळवून नेण्यात आल्याचे लक्षात आल्याने सदर माहिती साक्री तहसीलदार प्रवीण चव्हाण के हे घटनास्थळी येऊन सर्व दुकानाचा पंचनामा करण्यात आला तसेच या स्वस्त धान्य दुकानाला जोडून असलेले घोड्यामळ येथे रेणुका दीपक महाजन स्वस्त धान्य दुकान क्र.१६ याची देखील पाहणी करण्यात आली व दुकान क्र.१३ व १६ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सील करण्यात आले, यासंदर्भात गाडी चालक मालक वसीम शकील पटेल, व शंभर रुपये स्टॅम्प पेपरने दुकान चालविण्यासाठी घेणारा मयूर शंकर आढे कासार या दोघा आरोपींविरोधात पोलीस स्टेशनात भादवि कलम १०९, ३७९, ३५३, ३४१, ५०६, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यासंदर्भात फिर्याद पुरवठा निरीक्षक सुशीला जेजीराम बागुल यांनी दिली आहे तर कारवाईवेळी तहसीलदार प्रवीण चव्हाण के साक्री, अप्पर तहसीलदार विनायक थविल, शासकीय पंच गोदाम लिपिक सुभाष बहिरम, लिपिक गणेश माळी, तलाठी सीआर साळवे, कोतवाल एम सी मोरे आदी उपस्थित होते रात्री उशिरापर्यंत पिंपळनेर पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दिवसभर दोन स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई होत असल्याने परिसरात सर्वत्र चर्चा होत होती.