प्रतिनिधी , नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी कोरोना लस देण्याचा ड्राय रन सुरू झालेला आहे. सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी ड्राय रनला सुरुवात झालेली आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालय, आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागपूर येथील उप जिल्हा रुग्णालयांमध्ये हा ड्राय रन सुरू झाला असून, या ठिकाणी जे आरोग्य सेवक आहेत ज्यांच्या रजिस्ट्रेशन आधी झालेला होत, त्यांना या ड्राय रनमध्ये लस देण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेल आहे. विशेष म्हणजे काहीशी भीती या ड्राय रन दरम्यान लस घेण्याच्या प्रात्यक्षिकांचा समावेश असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आली. नंदुरबार येथे ड्राय रन मध्ये पहिली लस घेण्याचा मान रेशमा चाफेटकर या महिला आरोग्य कर्मचाऱ्याला मिळाला. हा ड्राय रन सुरळीत पार पडावा यासाठी जिल्हा यंत्रणेने पुर्ण तयारी केलेली दिसून आली. विशेष म्हणजे एका व्यक्तीला लस घेण्यासाठी चार ते पाच मिनिटांचा वेळ लागेला.
