जनतेज न्युज

नवापूर तालुक्यातील गडदानी गावात दोन बिबट्यांच्या मुर्त्यू प्रकरणी 6 संशयित अटक.

प्रतिनिधी ,नंदुरबार : नवापुर तालुक्यातील गडदाणी गावाजवळील जंगलात नर-मादी दोन बिबट्यांच्या मुर्त्यू प्रकरणी वनविभागाने 6 संशयितांना अटक केली आहे. गडदाणी गावातील एका व्यक्तीची गाय बिबट्यांनी जंगलात ठार केल्यामुळे रागाच्या भरात मृत गायीवर विषारी औषध टाकल्याने बिबट्याने खाल्यानंतर दोन बिबट्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बिबट्याचा मृत्यू नंतर काही नागरिकांनी नखे, दात, पायाचे पंजे कापून मृत बिबट्याला जंगलात पुरले होते. वनविभागाने या कारवाईत ६ जणांना अटक करून जंगलात पुरलेल्या मृत बिबट्याला बाहेर काढून शवविच्छेदन करून पंचनामे नंतर बिबट्याचा अंत्यविधी करण्यात आला. मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे. याचा अधिक तपास वनविभागाने सुरू केला आहे. तर बिबट्याचे नखे, पायाचे पंजे बाळगल्याप्रकरणी संशयितांकडून हस्तगत करून अटक करण्यात आली आहे. सदर बिबट्यांचा मृत्यू 15 ते 20 दिवस आधी झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.