प्रतिनिधी , मुंबई : नवीन वर्षामध्ये राज्यातील महिला स्वबळावर विकसित होऊन कार्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा त्यांची एंट्री झाली पाहिजे यासाठी माविम च्या माध्यमातून राज्यात महिलांसाठी नवीन योजना उभारणार असे सांगून राज्याच्या महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना च्या काळात सर्वात जास्त हाल महिलांचे झाले, किंबहुना महिलांनीच कोरोना वॉरियस होऊन या कोरोणाच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात काम केलं, त्यामुळे कोरोणाच्या काळात सर्वांनी आपल्या जीवाला जपून खबरदारी घेतली पाहिजे असे सांगत राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.
