जनतेज न्युज

नवी मुंबईत आत्ता 365 दिवस राबविण्यात येणार स्वच्छता अभियान..

प्रतिनिधी , नवी मुंबई : मुंबईतील रेल्वे स्टेशन पर्यटन स्थळ खाडीकिनारी स्वच्छता मोहीम 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट एन एस एस तसेच सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. एक तारखेपासून कोपरखैरणे गवळीदेव ऐरोली तसेच आज घनसोली रबाळे परिसरात ही मोहीम परिसरात राबविण्यात आली आहे. ही मोहीम 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत राबविण्याचा मानस होता, मात्र या स्वच्छता अभियानास मिळणारा प्रतिसाद पाहता 365 दिवस नवी मुंबई शहरात ही स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय ग्रील रूप या सेवाभावी संस्थेने घेतला आहे. या मोहिमेला सेवाभावी संस्था एनजीओ कॉलेज व एन एस एस चे विद्यार्थी आणखी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतील।