प्रतिनिधी , नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील झोपडपट्टी भागातील एका मूकबधिर मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्का दायक घटना उघड झालीय…बिलोली शहरातील झोपडपट्टी येथे राहणारी एक मूकबधिर 27 वर्षीय युवती दिनांक 9 डिसेंबर रोजी सांयकाळी घरात शौचालय नसल्याने शौचासाठी जवळील जिल्हा परिषदेच्या पाठी मागे गेली असता आरोपींनी तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर शारीरिक अत्याचार करून करून तिचा दगडाने ठेचून खून केलाय…या प्रकरणी मयत मुलीच्या चुलत भावाने दिलेल्या फिर्यादी वरून बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…परंतु या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन साईनाथ या आरोपीस ताब्यात घेतले आहे .या प्रकरणी भारतीय दंड संहिता नुसार कलम 302,376(2)(1),354,354D या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
