जनतेज न्युज

नागरिकांच्या सुविधेसाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून हेल्पलाईन सुरू

कोरोना संसर्ग प्रतिबंध उपाययोजना

प्रतिनिधी, अमरावती : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांबाबत आवश्यक माहिती व नागरिकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून दूरध्वनी व व्हाटसॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. काहीही अडचण आल्यास या सुविधेचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून विविध पाऊले उचलण्यात येत आहेत. सुरक्षितता म्हणून संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात नागरिकांना आवश्यक माहिती व त्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

त्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वत:च्या निवासस्थानाचा ०७२१२६६५५७३ हा लँडलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. याच क्रमांकावर व्हाटस ॲप सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी तीन जणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. नागरिकांनाही कुठलीही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.