प्रतिनिधी, नांदेड : नायगाव तालुक्यातील मांजरम येथे आज पहाटेच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे पावसाचे पाणी शेतामध्ये साचले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा पूर्ण पीक गेले असून तरी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकऱ्यातून मागणी होत आहे या वर्षीचा हंगाम सुद्धा गेला पुढील हंगामात सुद्धा उत्पादन मिळेल याची शाश्वती नाही तरी प्रशासनाने सर्व शेतीचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा जेणेकरून शेतकऱ्यांना काहीतरी प्रशासनामार्फत हातभार लागेल.
